
बीड : बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झेंडा विक्रीवरून दोन गटात वाद झाला आणि पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. लाठ्या काठ्यांनी भर रस्त्यावरच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. अचानक दोन गट आमनेसामने आल्याने थोडा काळ तणाव निर्माण झाला होता, शिवाय वाहतूक देखील बऱ्याच काळ खोळंबून राहिली. तब्बल पंधरा मिनिटानंतर दोन्ही गटातील वाद शांत झाला.