27.9 C
New York
Monday, April 29, 2024

Buy now

सोन्यापेक्षाही जास्त मिळाली अंड्याला किंमत, नक्की असं काय होतं त्यात?

- Advertisement -

सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीबद्दल तुम्ही ऐकलं असेल, त्याला कधी पाहिलं नसेल. पण आज आम्ही अशा अंड्याबद्दल सांगणार आहोत ज्याला सोन्यापेक्षा जास्त भाव मिळाला.

- Advertisement -

वास्तविक, जम्मू-काश्मीरमधील सोपोरच्या मालपोरा गावात मशिदीच्या बांधकामासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू झाली. लोकांनी मशिदीच्या बांधकामासाठी जमेल ते दान केले.

- Advertisement -

मीडिया वृत्तानुसार एका गरीबाने मस्जिद समितीला अंडी दान केली. मशीद समितीने ते देणगी म्हणून स्वीकारली होती.

पण समितीने या अंड्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा हे दान केलेले अंडे गावकऱ्यांचे आकर्षण ठरले. या अंड्याची किंमत दहा रुपयांपेक्षा जास्त नसती पण लिलावात त्यासाठी बोली लावणाऱ्यांची कमी नव्हती.

रिपोर्टनुसार, ही अंडी अनेक लोकांच्या हातातून गेली. प्रत्यक्षात त्याचा अनेक वेळा लिलाव झाला. प्रत्येक लिलावानंतर, अधिक पैसे उभारण्यासाठी खरेदीदार दुसऱ्या लिलावासाठी ते परत करत असत.

रिपोर्टनुसार, स्थानिक लोकांनी सांगितले की, शेवटी एका व्यक्तीने 70,000 रुपयांना हे अंडे विकत घेतले. पुन्हा या अंड्याचा लिलिव केला गेला, तेव्हा लिलावामधून एकूण रक्कम अंदाजे ₹ 2.2 लाख होती.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles