15.6 C
New York
Tuesday, April 30, 2024

Buy now

कृषी महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

- Advertisement -

कृषी महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

- Advertisement -

आष्टी : कृषी महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालय आष्टी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे सत्य शोधक समाजाचे संस्थापक, स्त्री शिक्षणासाठी,समानता व सत्यासाठी देह झिजवणारे,सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे ,शोषित-वंचिताना आवाज देणारे,दिन दलितांचे कैवारी, पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी करणारे भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाजसुधारक होते. “विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।” अश्या प्रभावी कवितेच्या माध्यमातून नागरिकांना शिक्षणास प्रोत्साहित केले तसेच शिक्षणाचा तळागाळापर्यंत प्रचार अन् प्रसार केला. यावेळी प्रा. माहुरे एस. एस. यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की महात्मा फुले एक महान विचारवंत, कार्यकर्ते, समाजसुधारक, लेखक, तत्त्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारक होते. त्यांनी आयुष्यभर दुर्लक्षित जात, महिला आणि दीनदुबळ्यांच्या उन्नतीसाठी काम केले. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनीही या कार्यात हातभार लावला. यावेळी कृषी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मोहळकर, इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles