खाद्यपदार्थांच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट


रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर परिसरातील हयात नगरजवळ एका खाद्यपदार्थांच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरुन गेला.ही घटना सम्राट प्लाझा या इमारतीतील तळघरातील गाळ्यात मध्यरात्री १ वाजता घडली. या दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, हा प्रकार रात्री उशिरा घडल्याने कोणीही जखमी झालेले नाही.

या भागातील खाऊगल्ली म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेक लोक खाद्यपदार्थ विकत घेण्यासाठी सायंकाळी गर्दी करतात. मात्र, यातील अनेक दुकाने अनधिकृत असून, एका लायसन्स वर चार चार दुकाने चालवली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गुरुवारी एका फास्टफूड दुकानातील मालक दुकान बंद करून गेल्यानंतर रात्री १.१० वाजता या दुकानात ठेवलेल्या गॅसच्या सिलिंडरचा स्फोट झाला. दुकान बंद असल्याने कोणीही जखमी झाले नाही. याठिकाणी सुरक्षितेबाबत नियम पाळले जात नसून, अनेकजण दुकानासाठी घरगुती सिलिंडरचा वापर करीत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here