अल्पवयीन मुलीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार

यवतमाळ : अल्पवयीन मुलीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही घटना शनिवारी दुपारी बारा वाजता दरम्यान पाचधारा जंगलात घडली. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पीडित ही १४ वर्षाची असून, इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. शनिवारी ती शाळेत गेली. मात्र, घरी परत आली नाही.

त्यामुळे तिचा शोध घेतला. दुपारी पीडित मुलगी मावशीच्या घरी आली. तिला उशिरा येण्याचे कारण विचारले असता घडलेला प्रकार सांगितला. युवकाने तिला दुचाकीवर पाचधारा येथील जंगलात पळवून नेले. तिथे लग्न करण्याचे आमिष दाखवून अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून इम्रान शेख (वय २२, रा. भोसा) याच्याविरुद्घ गुन्हा नोंदविला. पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here