डाग लपवा !मुरूमे असलेल्या त्वचेसाठी योग्य फाऊंडेशन आणि कन्सिलरची आवश्यकता

0
104
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुरूमे (पिंपल्स) असलेल्या त्वचेवर मेकअप करणे फार मुश्कील असते. मुरूमे असलेल्या त्वचेसाठी योग्य फाऊंडेशन आणि कन्सिलरची आवश्यकता असते, तरच बेस व्यवस्थित बसू शकतो. अनेक वेळा हे लावलेले फाऊंडेशन पुन्हा निघून येण्याचीही भीती असते. तसेच मुरूमप्रवण त्वचेसाठी ऑइली किंवा जास्त ‘ग्लॉसी’ पेक्षा ‘मॅट’ मेकअप प्रॉडक्ट व्यवस्थित बसतात.

मुरूमप्रवण त्वचेवर मेकअप करताना प्रथम क्लिनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करण्याची गरज असते. वॉटर बेस मॉइश्चरायझरचा वापर करा. ही पहिली स्टेप झाल्यानंतर तुम्ही स्क्रीनवर हायड्रा जेलचा वापर करा. ज्यामुळ स्किन छान सॉफ्ट होईल.

पाच मिनिटे थांबून त्यावर तुम्ही पिंपल्स स्किनसाठी मॅटिफाय प्रायमर किंवा ऑइल फ्री प्रायमरचा वापर करा. ज्यामुळे तुमचे ओपन पर्ह्स भरून येतील किंवा ते कमी दिसतील. प्रायमरमुळे तुमच्या चेहऱयावर एक प्लेन असा बेस तयार होईल आणि त्यामुळे तुम्हाला पिंपल्स लपवणे सोपे जाईल.

प्रायमर लावल्यानंतर तुम्ही स्किन टोन पाहून योग्य कन्सिलर लावा. अनेक वेळा जास्त मोठे मुरूमे असतील किंवा जास्त लालसर डाग असतील तर तुम्हाला ग्रीन करेक्टर लावावा लागेल आणि जर कमी प्रमाणात मुरूमे असतील तर तुम्ही ऑरेंज कन्सिलरनेदेखील ही मुरूमे ‘कन्सिल’ करून घेऊ शकता.

कन्सिलर लावल्यानंतर तुम्ही त्यावर स्किनचा टोन बघून योग्य फाऊंडेशन निवडा. अलीकडे मुरूमे असलेल्या त्वचेसाठी स्पेशल फाऊंडेशनदेखील उपलब्ध असतात. त्याचा वापर केल्यास जास्त चांगले. फाऊंडेशन स्पंज किंवा ब्रशच्या सहाय्याने हळुवार लावा. जास्त घासून लावू नका. अन्यथा ते निघून येण्याची शक्यता असते किंवा त्याच्या आधी लावलेले कन्सिलर निघू शकते. त्वचा कोणत्याही प्रकारची असो किंवा त्यावर डाग, पिंपल्स असे काही असले तरी योग्य मेकअप प्रॉडक्टचा वापर आणि त्याचे योग्य तंत्र जर आपल्याला माहीत असेल तर आपला मेकअप चांगला होईल.

फाऊंडेशन लावून झाल्यानंतर तुम्ही चेहऱयावर गरज असेल त्या ठिकाणी कॉन्टुर करून घ्या आणि मग त्यावर मॅट पावडरचा वापर करा. पावडर लावतानादेखील ती तुम्ही जर ब्रशने लावली तर योग्य प्रकारे पसरली जाईल. त्यानंतर त्यावर अगदी हलका फिक्सर्स स्प्रे मारून घ्या. स्प्रे मारल्यानंतर लगेचच तो वाळवून घ्या आणि मग नेहमीप्रमाणे आयशॅडो, आयलाइनर, मस्कारा, ब्लशर, हायलाइटर हे योग्य प्रकारे चेहऱयाला लावून घ्या. बॅकग्राऊंड पेन्सिलने जिथे कमी आयब्रो असतील तिथे त्या व्यवस्थित फिनिशिंग करून घ्या आणि ब्रशने व्यवस्थित विंचरुन घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here